पंतप्रधान नरेंद्र मोदी चार दिवसीय अमेरिका दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान मोदींचा हा दौरा अनेक कारणांनी महत्त्वाचा मानला जात आहे. यावेळी पंतप्रधान मोदी आणि ट्विटरचे सीईओ, टेस्लाचे प्रमुख एलॉन मस्क यांची भेट झाली. मोदींशी सकारात्मक स्तरावर चर्चा झाली असून आपण पुढल्या वर्षी भारतात येऊ, अशी माहिती मस्क यांनी दिली.