मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे दोन दिवसीय पुणे दौर्यावर आले असून आज त्यांनी नवी पेठेतील मनसेच्या मध्यवर्ती कार्यालयास भेट दिली. त्यावेळी शहरातील पदाधिकारी उपस्थित होते. राज ठाकरे यांची गाडी कार्यालयाजवळ येताच कार्यकर्त्यांनी फटाक्याची माळ लावली. त्यामुळे राज ठाकरे यांना गाडीमध्ये पाच मिनिट बसून राहावं लागलं. त्यानंतर गाडीतून उतरताच कशासाठी फटाके वाजवले, असं म्हणत त्यांनी शहराध्यक्ष साईनाथ बाबर आणि मनसे नेते बाबू वागसकर यांना झापलं.