पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर गेले आहेत. येथे त्यांनी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन आणि त्यांच्या पत्नी म्हणजेच अमेरिकेच्या फर्स्ट लेडी जिल बायडेन यांची भेट घेतली. यावेळी जो बायडन आणि मोदींनी एकमेकांना काही अनोख्या भेटवस्तू दिल्या. दरम्यान, मोदींनी दिलेल्या भेटवस्तूंमध्ये विविधतेने नटलेल्या भारतातील विविध राज्यांची ओळख असलेल्या वस्तूंचा समावेश आहे. त्या भेटवस्तू नेमक्या कोणत्या हे जाणून घेऊ.