पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. अमेरिकेच्या संसदेला संबोधित करत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाषण केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेवर झालेला ९/११ चा हल्ला आणि भारतावर झालेला २६/११ चा दहशतवादी हल्ला याबाबत आपल्या भाषणात भाष्य केलं. ते म्हणाले, “दहशतवाद हा माणुसकीचा शत्रू आहे. हा दहशतवाद मोडून काढण्यासाठी योग्य पद्धतीने लढावं लागेल. आपल्या देशांची एकजूट या दहशतवादाचा सामना करु शकते. मुंबईवर जो दहशतवादी हल्ला झाला त्यानंतरही दहशतवादाचा धोका आहेच. त्याचा बिमोड करण्यासाठी संयुक्त प्रयत्नांची आवश्यकता आहे”