देशातील भाजपा विरोधकांची २०२४ साठीच्या निवडणुकीची रणनीती आखण्यासाठी एक बैठक आयोजित केली आहे. या बैठकीबाबत बोलताना राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार म्हणाले की, “देशातील विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांची पाटणा येथे बैठक होत आहे. या बैठकीमध्ये मणिपूर येथील घटनेसह देशातील अनेक प्रश्नांवर चर्चा होणार आहे. ज्या राज्यात भाजपाची सत्ता नाही त्या ठिकाणी रस्त्यावर उतरून, कायदा आणि सुव्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या घटनेमागे कोण आहे हे स्पष्ट होत असून हे देशाच्या दृष्टीने योग्य नाही”