पंतप्रधान नरेंद्र मोदी चार दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर गेले आहेत. त्यांनी गुरुवारी (२२ जून) व्हाईट हाऊसमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांच्याबरोबर द्विपक्षीय बैठक घेतली. या बैठकीनंतर नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली, या पत्रकार परिषदेवेळी मोदी यांना भारतातील मानवाधिकार आणि अल्पसंख्यांकांबाबत प्रश्न विचारण्यात आले.