महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा १४ जून रोजी वाढदिवस होता. त्यांच्या वाढदिवशी राज्यभरातून कार्यकर्ते त्यांना शुभेच्छा देण्यासाठी येत असतात. पण काही गेल्या दिवस कार्यकर्त्यांच्या आणि नेत्यांच्या शुभेच्छा देऊन झाल्यानंतर आज (२३ जून) दादरमधील विकास विद्यालय या शाळेतील कर्ण व मूकबधिर या विद्यार्थ्यांनी राज ठाकरे यांची भेट घेऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या व त्यांनी बनवलेल्या भेटवस्तू राज ठाकरेंना दिल्या. यावेळी एका चिमुकलीने ठाकरेंसमोर कविता सादर केली आणि ती कविता ऐकून त्यांनी त्या चिमुकलीला प्रेमाने जवळ घेतलं.