Mary Millben: मेरी मिलबेन जिंकली भारतीयांची मनं; ‘या’ कृतीची होतेय चर्चा; व्हिडीओ व्हायरल
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अमेरिका दौऱ्याचा आज (२४ जून) शेवटचा दिवस आहे. सकाळी त्यांनी रोनाल्ड रेगन सेंटरमध्ये अनिवासी भारतीयांना संबोधित केलं. यावेळी हॉलिवूडमधली प्रसिद्ध गायिका मेरी मिलबेन यांनी भारताचं राष्ट्रगीत गायलं. इतकंच
नव्हे तर नंतर मेरी मिलबेन यांनी मोदींचे चरणस्पर्श करत त्यांचा आशीर्वाद देखील घेतला. मेरी मिलबेन यांनी केलेल्या या कृतीचा व्हिडीओ सध्या सोशल व्हायरल होत आहे