पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चार दिवस अमेरिका दौऱ्यावर होते. संरक्षण उद्योगात भागीदारी, अंतराळ क्षेत्रात सहकार्य, सेमिकंडक्टर पुरवठा साखळी आणि संशोधनात भागीदारी, नव्या कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात भागीदारी आदींबाबतचे करार यावेळी करण्यात आले. या पार्श्वभूमीवर वॅाशिंगटन डिसी येथील रोनाल्ड रेगन सेंटरमध्ये झालेल्या कार्यक्रमात बोलताना भारत आणि अमेरिकेतील उद्योग क्षेत्राला एक स्पष्ट संदेश दिला. त्यावर उपस्थितांनी उभं राहून मोंदींना दाद दिली.