मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज पार्क या परिसरातील सेल्फी पॉईंट कायमच तरुणाईसाठी आकर्षणाचा विषय राहिला आहे. आता पावसाळ्याचं निमित्त साधून रंगबेरंगी छत्र्यांनी सेल्फी पॉईंटला सजवण्यात आलं आहे. त्यामुळे सेल्फी काढण्यासाठी पुन्हा एकदा तरुणाईची गर्दी येथे पाहायला मिळत आहे.