उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात कलगीतुरा रंगल्याचं पाहायला मिळत आहे. चंद्रपूरमध्ये झालेल्या पक्षाच्या कार्यक्रमात फडणवीसांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. यावेळी फडणवीसांनी शायरीच्या अंदाजात ठाकरेंना टोला लगावला. यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर त्यांनी टीकास्त्र डागलं