औरंगजेबाच्या कबरीला आपण भेट दिल्याने होणारी दंगल थांबली, असं विधान वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबडेकर यांनी केलं आहे. त्यावरून आता नवा वाद निर्माण होण्याची चिन्ह आहेत. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी प्रकाश आंबेडकरांच्या या विधानावरून गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला आहे. हिंमत असेल तर प्रकाश आंबेडकरांवर गुन्हा दाखल करा, असं आव्हान जलील यांनी दिलं आहे.