तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव आपल्या पक्षाच्या विस्तारासाठी प्रयत्न करत आहेत. राष्ट्रीय पातळीवर आपल्या पक्षाला ओळख मिळावी यासाठी त्यांनी तयारी सुरू केली आहे. या मोहिमेची सुरुवात त्यांनी महाराष्ट्रातून केली असून ढरपूरमधील विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी ते तब्बल ६०० गाड्यांचा ताफा घेऊन आले आहेत. यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे.