वांद्रे पूर्व येथील ठाकरे गटाच्या शाखेवर मुंबई महानगर पालिकेने कारवाई केली आहे. यावरून ठाकरे गट आक्रमक झाला आहे. या कारवाईवेळी बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या फोटोवर हातोडा मारण्यात आल्याचा दावा ठाकरे गटाकडून सातत्याने केला जातोय. यावरून ठाकरे गटाचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी निशाणा साधलाय.