तेलंगणाचे मुख्यमंत्री तथा भारत राष्ट्र समिती पक्षाचे (BRS)अध्यक्ष केसीआर आज सोलापूर दौऱ्यावर आहेत. आपल्या १०० आमदार, खासदार मंत्र्यांसह ते विठ्ठल दर्शनासाठी पंढरपुरात दाखल झाले. त्यानंतर त्यांनी सरकोली गावात जाहीर सभा घेतली. यावेळी महाराष्ट्रातील राजकीय पक्षांवर त्यांनी खोचक शब्दांत टीका केली.