आधी दर्शना पवार हत्याकांड आणि आता पुण्याच्या ऐन मध्यवस्तीतील सदाशिव पेठेत तरुणीवर कोयत्याने हल्ला करण्यात आल्याची घटना. या घटनांनंतर पोलिसांनी हल्लेखोराला अटक केली असून संबंधित तरुणीलाही रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पण पुण्यासारख्या विद्येचं माहेरघर मानल्या जाणाऱ्या शहरात खरंच मुलींची सुरक्षा धोक्यात आहे का? एकतर्फी प्रेमातून हिंसा वाढत जाते आहे का? यांसारख्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात पुणेकरांकडूनच..