राष्ट्रवादी काँग्रेसने ७० हजार कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप करत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शरद पवारांवर हल्लाबोल केला होता. यावर शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. “पंतप्रधानांनी देशवासियांबद्दल काय बोललं पाहिजे याचा नमुना देशासमोर ठेवला आहे. पंतप्रधानांनी केलेल्या वक्तव्याबद्दल त्यांनी स्वतः विचार करण्याची गरज आहे. शिखर बँकेचा त्यांनी उल्लेख केला त्याचा मी कधी शिखर बँकेचा मेंबर नव्हतो. मी कधी लोन घेतले नव्हते. मी त्या संस्थेचा कधीच सदस्य नव्हतो. याबाबत बोलणे कितपत ठीक आहे? इरिगेशनच्या बाबत त्यांनी वक्तव्य केलं मात्र ते खरे नाही”