पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी मध्य प्रदेशातील पाच वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. एकाच वेळी पाच वंदे भारत ट्रेन देशामध्ये सुरू करण्याची ही पहिलीच वेळ आहे. यावेळी पंतप्रधान मोदींनी ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या मुलांशीही संवाद साधला. पंतप्रधानांच्या मुलांसोबतच्या संभाषणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.