काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे दोन दिवस मणिपूर दौऱ्यावर होते. मणिपूरमध्ये मागच्या महिन्यापासून जातीय हिंसाचार भडकला आहे. या ठिकाणी ३०० हून जास्त शिबिरांमध्ये ५० हजार लोक वास्तव्य करत आहेत. याठिकाणी राहुल गांधींनी हिंसाचारग्रस्त भागांना भेट दिली. तसंच जातीय संघर्षामुळे विस्थापित झालेल्या पीडितांची भेट घेतली. यावेळी राहुल गांधींना पाहुन अनेकांना अश्रू अनावर झाले.