लोणावळ्यामधील प्रसिद्ध भुशी धरण ओव्हर फ्लो झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून लोणावळ्यासह मावळ परिसरात सतत कोसळत असलेल्या पावसामुळे बहुतांश धरणांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. परिसरातील धबधबे देखील वाहू लागले आहेत. सह्याद्रीच्या कुशीत वसलेले भुशी धरण देखील ओव्हर फ्लो झाले असून पायऱ्यावरून पाणी ओसंडून वाहात आहे. गेल्या वर्षी भुशी धरण जून महिन्यामध्येच ओव्हर फ्लो झाले होते. कोसळत असलेल्या पावसामुळे लोणावळ्यातील निसर्ग सौंदर्य अधिकच सुंदर दिसत आहे.