राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यासह काही आमदारांनी काल शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आणि अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार हे कराड येथील यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी अभिवादन करण्यासाठी निघणार आहेत. त्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राज्यसभा खासदार वंदना चव्हाण या शरद पवार यांच्या निवासस्थानी दाखल झाल्या. त्यावेळी वंदना चव्हाण म्हणाल्या की, “आमच्या पक्षातील अनेक ज्येष्ठ मंडळी आम्हाला सोडून गेले आहेत. ती आमच्यासाठी दुख:द घटना आहे. पण काल शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत जी भूमिका मांडली, तो निर्धार पाहून आम्हाला कोणालाही काळजी करण्याची गरज नाही”