अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या काही आमदारांनी शिंदे-फडणवीसांच्या सरकारमध्ये एन्ट्री केल्यानंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ माजली आहे. राष्ट्रवादीत दोन गट पडल्याचं चित्र आहे. एक गट अजित पवार यांना समर्थन देत आहे. तर दुसरा गट आपण शरद पवारांबरोबर असल्याचं म्हणत आहे. या पार्श्वभूमीवर आज ५जुलै रोजी पहिल्यांदाच राष्ट्रवादीच्या दोन बैठका पार पडत आहे. अजित पवार यांच्या नेतृत्वातील बैठक वांद्रे येथील एमईटीमध्ये पार पडली.