राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या बंडामुळे राज्यातील राजकीय समीकरणे पुन्हा एकदा बदलली आहेत. अजित पवार हे सरकारमध्ये गेल्याने शिंदे यांचे मुख्यमंत्री पद धोक्यात आल्याची चर्चा आहे. शिवाय अपात्रतेचा मुद्दाही आहेच. त्यामुळे आगामी काळात मुख्यमंत्री पद अजित पवारांना मिळेल, असं भाकीत काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी ‘लोकसत्ता लोकसंवाद’ या कार्यक्रमात बोलताना व्यक्त केलं आहे.