अजित पवारांसह राष्ट्रवादीतील ८ नेत्यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर आमदार रोहित पवार यांनी अजित पवरांसोबत गेलेल्या आमदारांवर टीका केली. यावर उत्तर देताना छगन भुजबळ म्हणाले की, “मी १९८५ मध्ये महापौर आणि आमदार झालो, त्यानंतर चार महिन्यांनी तुमचा (रोहित पवार) जन्म झाला. मला मोठं केलं, मोठं केलं.. अशा फालतू गोष्टी करू नका, इतिहास जाणून घ्या”