अजित पवारांसह राष्ट्रवादीतील ८ नेत्यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर अजित पवार आगामी काळात मुख्यमंत्री व्हावेत असं वाटतं का? असा प्रश्न आमदार रोहित पवार यांना विचारलं असता, “स्वाभिमानी महाराष्ट्रातील लोकांचा विचार आणि पुरोगामी विचार घेऊन अजित पवार मुख्यमंत्री झाले तर नक्कीच व्हावे. पण भाजपासोबत जर ते मुख्यमंत्री झाले तर नागरिक म्हणून माझ्या मनात खंत असेल की योग्य विचाराबरोबर ते मुख्यमंत्री झाले नाहीत”