अजित पवारांसह राष्ट्रवादीतील ८ नेत्यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर बारामती विधानसभा मतदारसंघातून अजित पवरांविरोधात कोण उभे राहणार? या चर्चांना उधाण आले होते. त्यावर आमदार रोहित पवार यांनी “आता मी बारामती विधानसभा निवडणुक लढविणार नाही. बारामतीमधील नागरिक नाराज जरी असले तरी ते दादांनाच मतदान करतील” अशी प्रतिक्रिया दिली.