उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका करताना वापरलेल्या कलंक या शब्दावरून सध्या बरचं राजकारण रंगताना दिसत आहे. उद्धव ठाकरेंच्या विरोधात भाजपा कार्यकर्त्यांनी नागपुरात आंदोलनही पुकारलं. या पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊतांनी पुन्हा एकदा फडणवीसांवर निशाणा साधला आहे. कलंक शब्दावर बंदी आहे का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.