Bacchu Kadu On Eknath Shinde: शिंदे-फडणवीस यांच्या सरकारला वर्ष पूर्ण झालं, तरी अजून पूर्णपणे मंत्रीमंडळ विस्तार झालेला नाही. आता सरकारमध्ये राष्ट्रवादीच्या ८ नेत्यांनी देखील मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यामुळे विस्तार नेमका होणार कधी? कोणाला त्यात स्थान मिळणार? अशी चर्चा सुरू आहे.
स्वतः आमदार बच्चू कडू देखील मुख्यमंत्र्यांचा फोन कधी येईल या प्रतिक्षेत आहेत.