अपक्ष आमदार बच्चू कडू गेल्या काही दिवसांपासून मंत्रिपदामुळे नाराज असल्याची जोरदार चर्चा होती. बच्चू कडूंनी केलेल्या सूचक विधानांमुळे अनेक तर्क वितर्क लढवले जात होते. यासंदर्भात आज १३ जुलैला आपण निर्णय जाहीर करणार असं त्यांनी म्हटलं होतं. अखेर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका सविस्तर मांडली आहे.