खाते वाटपावरून सध्या चर्चा रंगली आहे. पावसाळी अधिवेशनाच्या आधी खातेवाटप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, खाते वाटपावरुन सरकारमध्येच धुसफुस पाहायला मिळत आहे. या संदर्भात पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सरकारमध्ये तिसरा भिडू म्हणजे अजित पवार गटाच्या एन्ट्रीने हा विलंब होत असल्याचं पाटील म्हणाले.