पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या फ्रान्स दौऱ्यावर आहेत. यावेळी मोदींनी पॅरिसमधील ला सीन म्युझिकले या सभागृहात भारतीय समुदायाशी संवाद साधला. दरम्यान, आपल्या भाषणात अतंराळ क्षेत्राविषयी बोलताना मोदींनी भारताच्या महत्त्वपूर्ण अशा चांद्रयान-३ मोहिमेचा उल्लेख केला. चांद्रयान ३ चे प्रक्षेपण आज होणार आहे. या पार्श्वभूमीवर मोदींनी यासंदर्भात उल्लेख करताच उपस्थित भारतीय समुदायाने टाळ्यांचा कडकडाट केला.