पुणे महापालिकेच्या सुरक्षा विभागात लिंगभेदाला छेद देत, तृतीय पंथीयांचा देखील समावेश करण्यात आला आहे. मुख्य प्रवाहात त्यांना देखील सामावून घेण्याच्या ऐतिहासीक निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत केले जात आहे. तृतीयपंथी राजू ऊर्फ सान्वी डोईफोडे या सुरक्षा रक्षक म्हणून सेवेत रुजू झाल्या आहेत. त्या संत साहित्याच्या अभ्यासक आणि उत्कृष्ठ कीर्तनकार देखील आहेत. पुणे महापालिका भवनाच्या संरक्षणाची जबाबदारी पार पाडताना कीर्तनाची सेवा देण्याचा मानस देखील त्यांनी लोकसत्ताशी संवाद साधताना व्यक्त केला आहे.