भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांचा कथित आक्षेपार्ह व्हिडीओ एका वृत्तवाहिनीने प्रसारित केल्यानंतर राज्यात एकच खळबळ माजली आहे. या आक्षेपार्ह व्हिडीओ प्रकरणी विरोधकांकडून कारवाईची मागणी केली जात आहे. या प्रकरणी भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी देखील चौकशीची मागणी केली आहे. किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडावी. अन्यथा तुम्ही कोकणात घेऊन गेलेला हातोडा आम्हाला मंत्रालयावर घेऊन यावा लागेल, असा इशारही तृप्ती देसाई यांनी दिला आहे.