भाजपा नेते किरीट सोमय्या यांचा कथित आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. या व्हायरल व्हिडीओ प्रकरणात आता राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रियादेखील समोर येत आहेत. दरम्यान आज (१८ जुलै) विधानसभा पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी हे प्रकरण सभागृहात गाजण्याची शक्यता आहे. विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांनी या प्रकरणात यापूर्वीही काही महिलांनी आमच्या नेत्यांशी संपर्क केला असून सभागृहात संधी मिळाली तर पुरावे देणार असल्याची माहिती दिली आहे.