भारतीय जनता पार्टीचे माजी खासदार किरीट सोमय्या यांचा कथित आक्षेपार्ह व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओंमध्ये दिसणारी व्यक्ती अश्लील कृत्य करताना दिसत आहे. एका मराठी वृत्तवाहिनीने हा व्हिडीओ प्रसारीत केल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली. या प्रकरणाचे पडसाद महाराष्ट्र विधानपरिषदेच्या सभागृहातही उमटले. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी याबाबतचा एक पेनड्राईव्ह विधानपरिषद उपसभापतींकडे जमा केला. आणि त्यानंतर ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनीही या प्रकरणी चौकशी करण्याची विनंती गृहमंत्र्यांना केली.