भाजपाचे नेते तथा माजी खासदार किरीट सोमय्या यांचा आक्षेपार्ह व्हिडीओ समोर आल्यापासून विरोधक अधिक आक्रमक झाले आहेत. राज्यभरात आंदोलनं केली जात आहेत. गेल्या वर्षी पुणे महापालिकेच्या मुख्य इमारतीमध्ये किरीट सोमय्या आले होते. त्यावेळी त्यांना ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी केलेल्या धक्काबुक्की ते ज्या ठिकाणी पडले होते ती जागा काँग्रेस पक्षाच्या नेत्या संगीता तिवारी यांनी गंगाजल शिंपडून शुद्ध केली. तसेच यावेळी किरीट सोमय्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी देखील केली.