रायगडच्या खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी गावात दरड कोसळल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत चार जणांचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले आहेत. तर अनेकजण बेपत्ता असल्याची माहिती आहे. एनडीआरएफची दोन पथकं बचावकार्यासाठी इर्शाळवाडीत दाखल झाली आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री उदय सामंत, मंत्री दाद भुसे मदतकार्याचा आढावा घेत आहेत.