गेल्या महिनाभरापासून मणिपूरमध्ये जातीय हिंसाचार उफाळून आला आहे. जमावाने दोन महिलांची नग्न धिंड काढल्याची खळबळजनक घटना घडली आहे. संपूर्ण देश या घटनेवर संताप व्यक्त करत आहे. आजपासून (२० जुलै) संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू झालं आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वांना संबोधित करताना मणिपूरच्या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला.