रायगड जिल्ह्यातील इर्शाळगड येथे दरड कोसळल्यानंतर बचावकार्य सुरू आहे. उंच डोंगर त्यात सततचा पाऊस यामुळे बचावकार्यात अनेक अडथळे येत असून एनडीआरएफच्या जवानांकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे देखील दुर्घटनास्थळी दाखल झाले आहेत. यावेळी बचावलेल्या ग्रामस्थांना त्यांनी धीर दिला. तसंच एकंदर परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.