Jaya Bachchan On Manipur: मणिपूरमध्ये जमावाने दोन महिलांची नग्न धिंड काढत त्यांच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सर्वच स्तरातून संताप व्यक्त केला जात आहे. समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन यांनी देखील घटनेचा निषेध केला आहे. खरतंर ही घटना मे महिन्यात घडली होती. मात्र, त्याचा व्हिडीओ आता व्हायरल झाला असं त्या म्हणाल्या.