Devendra Fadnavis: “मी पाच वर्ष मुख्यमंत्री होता, पण…; देवेद्र फडणवीसांचा मविआला टोला
निधीवाटपाचा मुद्दा आज अधिवेशनातही गाजला. विधानपरिषदेत विरोधकांनी हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे. यावेळी त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील कारभाराचं उदारहरण दिलं. अडीच वर्षात एक फुटकी कवडीही देण्यात आली नव्हती, असा आरोप फडणवीसांनी केला आहे