राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सह सरकार्यवाह मदनदास देवी यांचे काल (२४ जुलै) वयाच्या ८१ व्या वर्षी निधन झाले. आज (२५ जुलै) वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असून त्यावेळी गृहमंत्री अमित शाह उपस्थित राहणार आहेत. त्यापूर्वी अमित शाह यांनी देवी यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासोबत भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, भाजपा नेते विनोद तावडे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा उपस्थित होते.