राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह मदनदास देवी यांचे काल (२४ जुलै) वयाच्या ८१ व्या वर्षी निधन झाले. आज (२५ जुलै) वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असून त्यावेळी गृहमंत्री अमित शाह उपस्थित राहणार आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते घरीच होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले.