गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात पावसाने जोर धरला आहे. अनेक ठिकाणी पाणी साचलं असून जनजीवन विस्कळीत झालं आहे. यातच येत्या ४८ तासांत राज्यात मोसमी पाऊस अतिसक्रिय होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. हवामानशास्त्रज्ञ शिल्पा आपटे यांनी मोसमी पाऊस, बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र आणि पश्चिम किनारपट्टीवर निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र याबाबत सविस्तर माहिती दिली.