शिवसेनेच्या ‘आवाज कुणाचा’ पॉडकास्टमध्ये खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली. यामध्ये उद्धव ठाकरेंनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केलं. पक्ष चिन्हाच्या संघर्षाबद्दल त्यांना प्रश्न विचारला असता त्यांनी निवडणूक आयोगाच्या भूमिकेवरही रोखठोक प्रतिक्रिया दिली. निवडणूक आयोगाचं काम हे निवडणूक निशाणी किंवा चिन्ह देण्याचं आहे. पक्षाचं नाव देण्याचं किंवा पक्षाचं नाव बदलण्याचं नाही, अशी टीका त्यांनी केली.