महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र आणि मनसे नेते अमित ठाकरे यांचं वाहन रोखल्यामुळे झालेल्या वादात मनसेच्या कार्यकर्त्यांनी समृद्धी महामार्गावरील टोलनाक्याची तोडफोड केल्याची घटना गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. दरम्यान, या तोडफोडीच्या प्रकरणावर मनसे अध्यक्ष प्रमुख राज ठाकरे यांनी भाष्य केलंय.