सध्या अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळत असून नद्या-नाले तुडूंब भरून वाहत आहेत. काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, पुण्यातही पावसाच्या सरी बरसत असून शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणक्षेत्रात मोठा पाणीसाठा जमा झाला आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली पाणीकपात रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अशी माहिती पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.