मातृभाषेतील शिक्षण मुलांना ज्ञान ग्रहण करण्यासाठी आवश्यक असल्याचं अनेक शिक्षणतज्ज्ञ सांगतात. मात्र, अनेकदा याच मातृभाषेवरून युवकांना दुजेपणाची वागणूक मिळते, भेदभावाला सामोरं जावं लागतं. इंग्रजीत न बोलता मातृभाषेत बोलणाऱ्यांबाबतही पूर्वग्रहदुषित मत बनवलं जातं. यावर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाष्य केलं. ते शनिवारी (२९ जुलै) नवी दिल्लीत आयोजित अखिल भारतीय संमेलनात बोलत होते.