संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांनी कठोर शब्दांत भिडेंवर टीका केली होती. त्यावर भाजपा खासदार अनिल बोंडे यांनी आक्षेप घेत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. भिडे गुरुजींचा अपमान सहन करणार नाही, असं ते म्हणाले. त्यावर यशोमती ठाकूर यांनी आता उत्तर दिलं आहे.