भाजपा नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे भाजपाच्या कार्यकर्ता मेळव्यात रविवारी (३० जुलै) उपस्थित होते. या कार्यक्रमात बोलताना त्यांनी नेत्यांना कार्यकर्त्यांचे महत्त्व समजावून सांगितले. यावेळी गडकरींनी बोलताना, ” शरद पवार म्हणजे पानवाल्याकडे असलेली डोळा मारणारी जपानी बाहुलीसारखे आहेत. प्रत्येकाला असं वाटतं की ती बाहुली आपल्याकडेच पाहून डोळा मारत आहे. कार्यकर्ता टिकवण्यासाठी प्रत्येक नेत्यांना ‘चॉकलेट’ वाटण्याशिवाय पर्याय नसतो. म्हणजे बावनकुळे चॉकलेट वाटत नाहीत. तरी सल्ला देतो, चांगले मिळण्याची अपेक्षा करा, पण नाही मिळाले तर दुःख नाही अशा पद्धतीने कामाचा आनंद घेत रहा”